बिग बॉस मराठी ३, १९ सप्टेंबरपासून सुरु होतोय.बिग बॉसच्या घरात यंदा कोण कोण झळकणार याची गेले महिनाभर सोशल मीडिया तुफान चर्चा रंगलीये. तब्बल एक वर्षाच्या गॅपनंतर आता बिग बॉस येतय. तर त्यामुळे ही उत्सुकता अजूनच वाढलीये. अनेक जणांची नावं ही गेल्या वर्षापासून चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता संग्राम समेळ. संग्रामला आपण ललित २०५, हे मन बावरे, शुभ मंगल ऑनलाईन अशा मालिकांमध्ये पाहिलं आहे. बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार का याबाबत संग्रामला विचारले असता त्याने या सर्व अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. पण तरीही या अफवा थांबत नसल्यानं संग्राम खूपच नाराज झाला आहे. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, 'मी बिग बॉस मराठी ३मध्ये सहभागी होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यात. या सगळ्या अफवा आहेत. जेव्हा पासून शोची घोषणा झाली तेव्हा पासून सातत्याने मला याबाबत विचारणा होत आहे. काहींनी तरी माझे नाव अंतीम स्पर्धकांच्या यादीमध्ये सामविष्ट केले आहे. या सगळ्यांचा परिणाम थेट माझ्या कामावर होतोय.लोकांना वाटते की मी बिग बॉस मराठी ३च्या घरात जात आहे.Chitrali vo<br />#Biggboss3 #Maheshmanjarekar #SangramSamel #Lokmatfilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br />सबस्क्राईब करायला क्लिक करा - <br />https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber